वाचनवेडे हे जगभरात पसरले आहेत. ज्या ज्या भाषेत लिखित वाङ्मय आहे त्या त्या भाषेत वाचनवेडे असणारच. मराठी भाषेतील साहित्याचे आपण वाचक आहोत. स्वतंत्रपणे आणि आपापल्या सवडीप्रमाणे आपण वाचन करतच असतो. पण वेळ, आवड आणि उपलब्धता ह्यांअभावी खूपसे काही आपल्या नजरेतून निसटून जात असते. मात्र हे आपल्या नजरेतून निसटलेले इतरांच्या वाचनात आलेले असू शकते. आपण वाचलेले पण आपणास विशेष न जाणवलेले, कदाचित दुसऱ्या एखाद्यास जाणवलेले असू शकते. असे आपण वाचनवेडे काही नियमित कालावधीत एकमेकांस भेटत राहू आणि आपणांस चांगल काही वाटलेले दुसऱ्यापर्यंत पोहोचवू, इतरांस चांगले काही गवसलेले त्याच्याकडून जाणून घेऊ अशा उद्देशाने मुंबईतील वाचनवेड्यांचा एक गट तयार झाला. 'संवाद' हे त्याचे नाव.
'संवाद' हा वाचकगट साधारणपणे २००० सालापासून कार्यरत आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी संध्याकाळी एकत्र जमून आधी ठरवल्याप्रमाणे एखाद्या साहित्यिकाविषयी, साहित्यप्रकाराविषयी, साहित्यिक संकल्पनेविषयी वेचक मुद्द्यांवर (सुमारे २ ते २।। तास) चर्चा करण्याचा उपक्रम हा गट राबवित आहे. ह्या साहित्यविषयक चर्चेच्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि एकमेकांची साहित्याची जाण अधिकाधिक विकसित व्हावी हा हेतू ह्या उपक्रमामागे आहे. ह्यातील सहभाग खुला असतो. म्हणजे साहित्याविषयी चर्चा करण्याची इच्छा असणारी कुणीही व्यक्ती चर्चेत सहभागी होऊ शकते. 'संवाद' ह्या गटात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क भरणे अथवा कोणाचीही परवानगी घेणे आवश्यक नाही.
नुकताच 'संवाद'ने विवेक व्यासपीठ आणि आमी गोयंकार ह्या संस्थांच्या सोबत कविवर्य बा. भ. बोरकर ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'जिणे गंगौघाचे पाणी' हा कार्यक्रम आयोजित केला होता. ह्या कार्यक्रमाची कल्पना आणि त्यानुसार त्याची आखणी करण्याचे काम 'संवाद'ने केले होते.